13 एप्रिल 2024 रोजी सायली आणि सोहम यांनी एकमेकांना लग्न बंधनात अडकण्याचे वचन दिले.
सायलीचे आई वडील, सौ. वर्षा व श्री. विवेक बिवलकर आणि सोहम चे आई वडील, सौ. सुजाता व श्री. प्रफुल्लचंद्र दिघे यांनी आपल्या मुलांच्या पसंतीला मान्यता दिली.
मग सोहम पारंपारिक कुर्ता बदलून शेरवानी परिधान करून आला आणि एक बहारदार गाणे पेश केले…. त्या गाण्याच्या साथीने सायली ने सभागृहात प्रवेश केला. ह्या वेळेस तीने चिकू कलर चा लेहेंगा घातला होता.
उपस्थितां मधे वयाने सर्वात जेष्ठ असे सायलीचे नाना (श्री. अरविंद गाडगीळ) आणि नानी (सौ. अरुंधती गाडगीळ) होते. त्यांच्या लग्नाला 60 वर्षे, नानांना 85 व नानीला 80 वर्षे ह्या वर्षीच झाली आहेत. ह्या त्रिवेणी योगाची कौतुक भरली दखल घेऊन त्यांच्या लेकीने व इतर सुवासिनींने त्यांचे कणकेच्या 60 दिव्यांने 85 हा आकड्यात मांडून औक्षण केले. सायलीच्या जोत्स्ना दातार या मैत्रीण कम मावशीने औक्षणाचे दिवे आणले.
पुरोहिता सौ. ऋता जोगळेकर यांनी ह्या जेष्ठ जोडप्याच्या दिर्घ व निरोगी आयुष्यासाठी रोगनाशन प्रार्थना केली. ह्या प्रार्थनेत, होऊ घातलेल्या जोडप्यास सुद्धा समाविष्ट करून घेतले.
आजी आजोबां कडून आशीर्वाद घेऊन सायली सोहमने केक कटिंग केले .
जसा पारंपरिक विधी होता तसा केक पण होता. जशी गर्भरेशमी पैठणी आणि कुडता होता तसा लेहेंगा आणि शेरवानी पण होती. मग खान पान एकसुरी असून कसं चालेल ! सुरवातीलाच चहा कचोरी होती. मग चैत्र महिन्याच्या निमित्ताने आंबे डाळ आणि पन्हे. तळ मजल्यावर पाणी पुरी, शेव पुरी, वेज पराठा, लच्छा पराठा, छोले, सॅलड, मसालेभात, टोमॅटो सार , कालाजाम, गाजर हलवा आणि आईस्क्रीम विथ चाॅकलेट साॅस असा विविध प्रांतीय बेत होता.
चि.सौ.कां. सायली व चि. सोहम चा साखरपुडा सोहळा संपन्न झाला.
~ मंडळी ~
हे सर्व निर्विघ्न पणे होण्यास बरीच मंडळी कार्यरत होती.
सोहम च्या आई सौ. सुजाता व दिदी स्वर्णिमा ह्यांनी सामग्री उपलब्ध केली. पार मिरज व पुण्याहून आलेल्या रिंकू दांडेकर व तेजू पटवर्धन या सायलीच्या आत्यांनी सामान व उपकरणे मांडायला मदत केली.
वेळात वेळ काढून आणि तब्बेतीचे कारण पुढे न करता सायलीची मावशी आजी आणि संगमनेर हून काकू आजी यांनी सुद्धा उत्साहात हजेरी लावली.
ताईचा नवरा बघायला नाशिक, पुणे, कल्याण, मिरज ,डोंबिवली, वाशी येथून भावंड ट्रॅफिक चा सामना करत वेळेत आले.
प्रणिता, चैतन्य, रुपाली, सुरेंद्र ह्यांनी वेलकम बोर्ड लवण्यापासून ते साखरपुडा तयार करण्यात हातभार लावला. ऋषिकेश दोघांचा मित्र म्हणून दोन्हीकडून कार्य सिद्धीस नेण्यास तत्पर होता.
जुईली आणि कृत्तिका ह्यांनी अंगठ्या ठेवायचा बॉक्स अतिशय सुरेख सजवला होता
हा सर्व कार्यक्रम चालू असतानाच सायलीचा धाकटा भाऊ पुष्कर बिवलकर व त्याची मित्र मैत्रीणीची टीम पाहुण्यांचे अभिनंदन पर शुभेच्छा देणारे संदेश छायाचित्रित करत होते.
तसेच, पुष्कर बिवलकर याने उपस्थित मंडळीची उपस्थिती ही औपचारिकता नसून त्याच्या ताई साठी ते कसे महत्त्वाचे नातलग आहेत हे छोट्या छोट्या किश्शामधे सांगितलं. सौ. वर्षा यांनी सोहम ची त्यांच्या कुटुंबात ओळख कशी झाली व तो त्यांच्यातलाच कसा होऊन गेला हे थोडी खसखस पिकवत सांगितलं.
स्वर्णिमाने, सोहम सायली आणि ती,असे त्रिकूट, यांच्यातील गमती सांगताना त्यांच्यातील नात्यात कसा सहजपणा येत गेला हे सांगितलं. सोहम च्या मावसबहीणीने त्यांच्यातील उपस्थितांची ओळख करून देत, सोहम चे लहान पणीचे किस्से सांगितले.
शाळेतील, ऑफिस चे, जवळचे, दूरचे, सगळ्या मित्र मंडळाच्या उपस्थितीने कार्यक्रमाला पूर्तता आणली.
सोहम आणि सायली हे त्यांच्या दोन्ही पोषाखात सुंदर आणि दिमाखदार दिसलेच. पण सगळ्यात लक्षवेधक होता त्यांच्या चेहर्यावरचा आनंद आणि जोडीला त्यांचं एकमेकांवरचं प्रेम.